चांदीचा दर १८ हजार रुपयांनी वधारला

मुंबईच्या सराफा बाजारात आज चांदी पुन्हा सुमारे १८ हजार रुपयांनी महाग झाली. त्यामुळं करांसह एक किलो चांदीसाठी ३ लाख २७ हजार रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत होती. या तेजीमुळं चांदीच्या दरांमधली कालची १९ हजार रुपयांची घसरण भरुन निघाली. सोनं आज तोळ्यामागे सुमारे ३ हजार रुपयांनी महाग झालं. त्यामुळं एक तोळा २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५९ हजारांच्या पलीकडे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५५ हजार रुपयांच्या पलीकडे गेला होता. 

शेअर बाजारातली कालची तेजी औट घटकेची ठरली आणि सेन्सेक्स पुन्हा ७७० अंकांनी घसरुन ८१ हजार ५३८ अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्येही २४१ अंकांची घट झाली आणि हा निर्देशांक २५ हजार ४९ अंकांवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयानं आज ९२ रुपयांच्या पातळीला स्पर्श केला. तसंच गुंतवणूकदारांनी सर्वदूर विक्री केल्यानं शेअर बाजारात घसरण दिसून आली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.