डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं – नेते उद्धव ठाकरे

मराठी माणसाची शक्ती सरकारच्या सक्तीला हरवू शकते, हे त्रिभाषा धोरणासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयावरून स्पष्ट होतं, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज वार्ताहर परिषदेत केलं. यासंदर्भात सरकारनं नेमलेल्या समितीला काहीही अर्थ नाही. कोणतीही समिती नेमली, तरी हिंदीची सक्ती करू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठी माणसानं एकत्र येण्यासाठी एखादं संकट यायची वाट पाहू नये. ही जाग कायम ठेवावी, असं आवाहन त्यांनी केलं. हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला होणारा मोर्चा रद्द केलेला नाही, उलट जल्लोष किंवा विजयी मोर्चा किंवा सभा या दिवशी होईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.