डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

राज्यभरात विविध ठिकाणी आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात ५९ रिक्त पदांसाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी एकूण ३ हजार ५७७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेची मैदानी चाचणी १९ ते २७ जून दरम्यान पालघर मध्ये होणार आहे.

 

वाशिम जिल्ह्यातही पोलिस दलातल्या ६८ रिक्त जागांसाठी आज सकाळपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या जागांसाठी चार हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही भरती प्रक्रिया पुढील तीन दिवस चालणार आहे.

 

 

बुलडाणा जिल्हा पोलिस दलातल्या १३३ पदांसाठी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या पदांसाठी एकूण १० हजार २३६ अर्ज आले आहेत. राज्यात इतर जिल्ह्यांतही या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.