September 4, 2024 7:05 PM | ST

printer

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीतून संपकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कालपासून सुरू असलेल्या संपामुळं प्रवाशांचे हाल सुरू आहे.

 

गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप पुकारल्यानं गावी जाणाऱ्या नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनंही आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.