डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 16, 2024 9:59 AM | Hockey

printer

चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम क्रिडा प्रोत्साहन मंडळ संघाला जेतेपद

 

पुण्यात झालेल्या वरिष्ठ पुरुष गटाच्या चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने विजेतेपद राखलं. सलग दुसऱ्यांदा त्यांनी जेतेपदावर नाव कोरलं. गेल्या वेळी उपविजेता ठरलेल्या रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाचा पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने पेनल्टी शूटआउटवर 3-2 असा पराभव केला.

 

सुमीत कुमार, शिलानंद लाक्रा तसंच कर्णधार देविंदर वाल्मिकीने गोल केले. तत्पूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सेवा क्रीडा नियामक मंडळ संघाने भारतीय अन्न महामंडळ संघाचा पराभव करत तिसरं स्थान राखलं. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं.