डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जातो- उपराष्ट्रपती

विकसित भारताचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतातून जातो. म्हणूनच, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल आणि समृद्धी आणण्यासाठी योगदान देण्याची जबाबदारी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि विद्यार्थ्यांची आहे, असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. ते काल मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथल्या राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या संवादात्मक कार्यक्रमात बोलत होते.

 

शेतकरी केवळ पीक उत्पादक राहू नयेत, तर ते कृषी-उद्योजक बनतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कृषि विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि संशोधनाचा वापर करून कृषी क्षेत्रातील व्यवस्थापक बनण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं. राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, केंद्रीय ईशान्य प्रदेश संचार आणि विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अरविंद कुमार शुक्ला हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.