आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपुरात दाखल होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी इथं मुक्कामी असून संत तुकाराम महाराज, सोपान काका महाराज, संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्या पालख्या पंढरपूर जवळ पोहोचल्या आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपुरात वीस लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. एकादशीपूर्वीच पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाले आहेत. पंढरपुरात, नगर प्रदक्षिणा मार्ग, नामदेव पायरी, विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे. तर मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पंढरपूर शहरात पालिकेनं स्वच्छतेच्या दृष्टीनं तब्बल साडे सोळाशे कर्मचारी नियुक्त केले आहेत. याठिकाणी वारकरी तसंच भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Site Admin | July 5, 2025 5:22 PM | Aashadhi Ekadashi | Pandharpur
आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपुरात दाखल
