डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर

म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात, झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर गेली आहे. म्यानमारच्या मंडाले भागाला शुक्रवारी अगोदर ७ पूर्णांक ७ रिख्टर आणि त्यापाठोपाठ काही मिनिटांनी ६ पूर्णांक ४ एवढ्या मोठ्या क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसल्यानं म्यानमारसह आसपासच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. देशात भूकंपात मरण पावलेल्यांची संख्या आता २ हजार ५६ झाली असून ३ हजार ९०० च्या वर नागरिक जखमी झाले आहेत.
तर जवळपास २७० व्यक्ती अद्याप बेपत्ता आहेत, असं म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान या प्रचंड जीवितहानीमुळं सरकारनं ७- दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान संपूर्ण देशभर बचाव कार्य वेगात सुरू आहे. भारत, रशिया, अमेरिका, संयुक्त राष्ट्रे आणि युएईसह अनेक ठिकाणहून मदत पथकं देशात दाखल झाली असून त्यांनी मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदतही पाठवली आहे.
दरम्यान ब्रम्हा मोहिमेअंतर्गत ५० टन मदत आणि बचाव सामग्री घेऊन जाणारी भारतीय नौदलाची सातपुडा आणि सावित्री ही जहाजं काल यांगून इथं दाखल झाली. भारतीय हवाई दलाची सहा विमाने आणि पाच भारतीय नौदलाच्या जहाजांसह, भारताची मदत यांगून, नायपिताव आणि मंडाले येथे पोहोचवण्यात आली आहे. अशी माहिती यांगूनमधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांद्वारे दिली आहे

सर्वाधिक वाचले

सर्व पहा