११व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित योगसंगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या १० लाखांच्या वर

अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या २१ जूनला साजरा होणार आहे. आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमधे भाग घेणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे….
(योग एक कुछ एक दिन का इवेंट नहीं योग को अपनी जीवनशैली बनाना चाहिए और हमारे प्रधानमंत्री ने भी ये संदेश दिया है कि योग को अपनी जीवनशैली बनाओ अपने जीवन में योग को स्थान दो और योग के माध्यम से तंदुरुस्त रहो आप तो खुद योगा हर रोज करो योगा के लिए समय दो लेकिन आपके परिवार में जो भी लोग हो बुजुर्ग हो माता बहने हो बच्चे हो सभी को योगा करने के लिए प्रवर्तन करें।
कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना, ना कोई बंधन,ना कोई बॉडी टाइप बचपन हो या पचपन, व्हील चेअर हो या वर्क फ्रॉम होम, योग सबका हक है… योग जीवन से जब जुडता है, एक सहज क्रिया बन जाता है, तो वो प्रतिफल उसका बेनिफिट देता रहता है… आइये इस इक्कीस जून हम सब हिस्सा बने अंतरराष्ट्रीय योग दिवस का और करे स्ट्रेच एंड चिल योग के साथ…)
दरम्यान, उद्याच्या विशाल योगसंगम कार्यक्रमासाठी देश- विदेशातून नोंदणी करणाऱ्या योग अभ्यासकांची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे.