डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 9, 2024 1:23 PM | share marke

printer

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांच्या संख्येत पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या विशिष्ट नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येनं पहिल्यांदाच १० कोटींचा टप्पा पार केला आहे. मार्च २०२१ मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ४ कोटीवर पोहोचली होती. हा आकडा गाठण्यासाठी २५ वर्षांचा काळ लागला होता. मात्र, त्यानंतर सुमारे  ६ ते ७ महिन्यात पुढचे १ कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार जोडले गेले होते.

 

तर, केवळ ५ महिन्यात गुंतवणूकदाराची संख्या ९ कोटीवरून १० कोटीवर पोहोचल्याचं, एन एस ई नं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. डिजिटायझेशन, आर्थिक समावेशन आणि गुंतवणूकदारांची जागरूकता यामुळे ही संख्या झपाट्यानं वाढत आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे. या १० कोटी गुंतवणूकदारापैकी बहुसंख्य गुंतवणूकदार महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातले आहेत.