देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ९५ कोटींवर तर दूरध्वनी वापरकर्त्यांची संख्या १२० कोटींवर

देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ८८ कोटींवरुन ९५ कोटी ४० लाखांवर गेली आहे. तर ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ९२ कोटी ४० लाख झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ७ कोटी ३० लाख आणि ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत ७ कोटी ७० लाखांनी वाढ झाल्याची माहिती दूरसंवाद मंत्रालयानं दिली आहे. देशातल्या दूरध्वनी वापरकर्त्यांमध्येही ३ कोटींची वाढ झाली असून ही संख्या १२० कोटींवर गेल्याचं भारतीय दूरसंवाद प्राधिकरणाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.