कोलकात्याच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होणार आहे. या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठासमोर या प्रकरणाचा ताजा अहवाल सादर होणार आहे.
दरम्यान, सीबीआयने काल या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळा पोलीस स्टेशनचे माजी प्रभारी अधिकारी अभिजित मंडल यांना या प्रकरणात अटक केली. या दोघांवर पुराव्यांशी छेडछाड करणं आणि तक्रार दाखल करायला उशीर करणं असे आरोप आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने या दोघांना ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
 
									 
		 
									 
									 
									 
									