डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुढचा कृती कार्यक्रम जाहीर

बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यानी त्यांचा पुढचा कृती कार्यक्रम जाहीर केला. भेदभाव विरोधी चळवळीच्या रिफत रशीद, अब्दुल हनान मसुद आणि माहीन सारकर या समन्वयकांना त्यांच्या साथीदारांसाहित पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

आरक्षण सुधारणांसाठी आयोगाची निर्मिती, खोटे गुन्हे नोंदवून अटक केलेल्या आंदोलकांची सुटका, हिंसाचारात सहभाग असणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना बडतर्फ करणं अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. १४ देशांनी संयुक्तपणे पत्राद्वारे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परराष्ट्र मंत्री हसन महमुद यांना विनंती केली आहे.