डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिली. जलशक्ती मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथे राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक संस्था, शाळा किंवा महाविद्यालय, उद्योग, सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ती संघटना, संस्था आणि नागरी संस्था अशा ९ श्रेणींमध्ये ३८ विजेते निवडण्यात आले. सर्वोत्कृष्ट राज्याच्या गटात ओडिशाने पहिला, उत्तर प्रदेशने दुसरा तर गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्रालाही पाच जलपुरस्कार मिळाले आहेत. यात सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या श्रेणीत पुणे शहराला तसंच, सर्वोत्कृष्ट उद्योग या श्रेणीत यवतमाळच्या रेमंड युको डेनिम कंपनीला तिसरा क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता श्रेणीत बुलडाण्याच्या पेंटकली प्रकल्पाला पहिला क्रमांक मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट नागरी संस्थेच्या श्रेणीत पहिला क्रमांक पुण्याच्या बैफ विकास आणि संशोधन केंद्राला तर दुसरा क्रमांक नाशिकच्या युवामित्र संघटनेला मिळाला आहे.