शेअर बाजार निर्देशांकानं ओलांडली ८० हजारांची उच्चांकी पातळी

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज व्यवहार सुरु होतानाच जोरदार उसळी घेत विक्रमी ८० हजारांचा टप्पा पार केला. शेअर बाजाराची ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे. सेंसेक्स ५७२ पूर्णांक ३२ अंकांच्या वाढीसह ८० हजार १३ अंकांवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील १६७ अंकांच्या वाढीसह २४ हजार २९१ पूर्णांक ७५ अंकांवर उघडला.