राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु

 

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. सभागृहात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहासमोरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

 

सभागृहाच्या कामकाजापूर्वी विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजबिल माफी, नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत इत्यादी मुद्द्यांवर विरोधकांनी घोषणा दिल्या. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार भाई जगताप, रवींद्र धंगेकर, अनिल देशमुख आणि इतरांनी विविध मुद्द्यांवरून सरकारचा निषेध केला. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणंघेणं नाही, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.