वस्त्रोद्योग मंत्रालयाची राष्ट्रीय परिषद येत्या आठवड्यात आसाम मध्ये गुवाहाटी इथं सुरु होणार असून या परिषदेला केंद्रीय आणि राज्यांचे वस्त्रोद्योग मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारताला जागतिक स्तरावरचं वस्त्रोद्योग केंद्र बनवण्यासाठी समन्वित राष्ट्रीय धोरण आखण्याच्या दृष्टीने या परिषदेत विचारविनिमय होणार आहे. देशात ३५० अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका वस्त्रोद्योग विकसित करण्याचं आणि २०३० पर्यंत वस्त्र निर्यातीची उलाढाल १०० अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याचं राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं या परिषदेत चर्चा होणार आहेत. याशिवाय रेशीम, हातमागावर तयार केलेल्या आणि बांबूपासून तयार केलेल्या वस्त्रांना तसंच महिलांच्या नेतृत्त्वाखालील उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर या परिषदेत भर देण्यात येईल.
Site Admin | January 4, 2026 2:50 PM
वस्त्रोद्योग मंत्रालयाची राष्ट्रीय परिषद येत्या आठवड्यात आसाम मध्ये गुवाहाटी इथं सुरु होणार