डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, २०२३ च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली, २०२५ चा मसुदा तयार

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, २०२३ च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली, २०२५ चा मसुदा तयार केला आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा मसुदा प्रसिद्ध केला. नागरिकांच्या डिजिटल स्वरुपातल्या वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत करण्याच्या हेतूने ही नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये आवश्यक तपशील आणि कारवाईबाबतचा मसुदा यांचा समावेश आहे. नागरिकांनी या नियमावलीच्या मसुद्याविषयीचे आपले अभिप्राय आणि सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.