जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आज जोरदार हिमवर्षाव होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आज थंडीची लाट राहील असा अंदाज आहे.
दिल्ली, हरियाणा, बिहार, छत्तीसगड आणि चंदीगडच्या काही भागात आज दाट धुक्याचा थर राहील, तर मध्य प्रदेश, ओदिशा, पश्चिम उत्तर प्रदेश, झारखंड आणि ईशान्य भारतातही अशीच स्थिती राहील असा अंदाज आहे.
दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरात हवेची गुणवत्ता अदयाप खराब श्रेणीत असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं म्हटलं आहे.