डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, सयाजी शिंदे, आमदार अमोल मिटकरी यांचा समावेश आहे.