डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधानपरिषदे एकमतानं मंजूर

मुंबईतल्या रेल्वेमार्गांवरच्या विविध स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेनं आज एकमतानं मंजूर केला. मध्य रेल्वेमार्गावरच्या करी रोड स्थानकाचं नाव लालबाग स्थानक, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरच्या सॅन्डहर्स्ट स्थानकाचं नाव डोंगरी स्थानक, पश्चिम रेल्वेमार्गावरच्या मरीन लाइन्स स्थानकाचं नाव बदलून मुंबादेवी स्थानक, तर चर्नी रोड स्थानकाचं नाव गिरगाव स्थानक करण्याची शिफारस या प्रस्तावात केली आहे. 

तसंच हार्बर रेल्वे मार्गावरच्या कॉटन ग्रीन स्थानकाचं नाव काळा चौकी स्थानक, डॉकयार्ड स्थानकाचं नाव माझगाव स्थानक, तर किंग्ज सर्कल स्थानकाचं नाव बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारसही या प्रस्तावात आहे. 

मंत्री दादाजी भुसे यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सभागृहानं आवाजी मतदानानं या प्रस्तावाला मंजुरी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.