एक्सिऑम – फोर या अंतराळयानाचं उड्डाण येत्या २२ जूनला

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या एक्सिऑम – फोर या अंतराळयानाचं उड्डाण येत्या २२ जूनपर्यंत पुढं ढकलण्यात आलं आहे. नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेला अंतराळ प्रयोगशाळेच्या दुरुस्तीच्या कामाची तपासणी करायची असल्यानं हे उड्डाण पुढं ढकलण्यात आल्याचं ॲक्सिऑम स्पेस कंपनीनं म्हटलं आहे. नवीन तारीख, उड्डाणासाठीच्या सर्व निकषांची तपासणी करुन ठरवली असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे.