आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात करणार श्रीलंकेचा दौरा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात आर्थिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या आढाव्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख पीटर ब्रेअर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ श्रीलंकेची आर्थिक धोरणं, सुरू असलेल्या सुधारणांवरील प्रगती आणि मागील करारांच्या अंमलबजावणीचा आढावा घेईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी श्रीलंकेला कर्जाचा पुढील हप्ता वितरीत करेल. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं विस्तारित निधी सुविधेला मंजुरी दिली होती.