October 23, 2024 2:35 PM

printer

महिलांसाठी भारतीय खुली गोल्फ स्पर्धा उद्यापासून हरियाणात सुरु हाेणार

महिलांसाठी भारतीय खुली गोल्फ स्पर्धा हरियाणात गुरुग्राम इथं उद्यापासून सुरु होत आहे. हे या स्पर्धांचं १६वं वर्ष आहे. यात २७ भारतीय खेळाडूंसह ३१ देशांमधून ११४ खेळाडू सहभागी होणार आहेत.

 

हिताशी बक्षी, वाणी कपूर, अमनदीप द्राल आणि रिद्धिमा दिलावरी हे प्रमुख भारतीय खेळाडू सहभागी होणार आहे. २०२३च्या आवृत्तीत अनुक्रमे तिसऱ्या आणि आठव्या स्थानावर असणाऱ्या दीक्षा डागर आणि गौरिका बिश्नोई देखील यंदा सहभागी होणार आहेत.