येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचं महत्त्व आणि आवश्यकता वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर उदंचन जलविद्युत प्रकल्प म्हणजेच पंपस्टोरेज हा प्रकल्प अपारंपरिक ऊर्जा स्रोतात भर घालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सहकारातून अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच राज्यात होत आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.