डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 7, 2024 3:26 PM

printer

महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार – मुख्यमंत्री

महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असलेलं सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत केलं. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघांच्या शिवसेनेच्या उमेदवार मनिषा वायकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

 

महायुतीचं सरकार रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचं काम करेल, असंही शिंदे यावेळी म्हणाले. .यावेळी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा खासदार रविंद्र वायकर, शिवसेना महायुतीच्या उमेदवार मनिषा वायकर, माजी खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होते.