सरकार दिव्यांग नागरिकांच्या हिताशी बांधिल – विरेंद्र कुमार

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने स्टार्ट अप आणि खासगी संस्थांशी ७२ सामंजस्य करार केले आहेत. याद्वारे दिव्यांग नागरिकांचं सक्षमीकरण करण्यात येणार आहे.  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. सरकार दिव्यांग नागरिकांच्या हिताशी बांधिल आहे हे या करारातून दिसून येतं असं विरेंद्र कुमार यांनी यावेळी सांगितलं. दिव्यांगांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना संधीची गरज असल्याचं ते म्हणाले.