डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सरकारनं गेल्या १० वर्षात महिला सक्षमीकरणासाठी अनेक अभूतपूर्व पावलं उचलली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

आपल्या सरकारनं गेल्या १० वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी अनेक अभूतपूर्व पावलं उचलली असून यापुढेही महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते हरियाणामधे पानिपत इथे बीमा सखी योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते. हरियाणानं ज्या पद्धतीनं एक है तो सेफ है हा मंत्र स्वीकारला आहे, हे इतर राज्यांसाठी उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले.
महिलांमध्ये आर्थिक साक्षरता तसंच विम्याविषयीची जागरूकता वाढावी, यादृष्टीनं ही योजना तयार केली आहे. आयुर्विमा महामंडळाच्या मदतीनं राबवल्या जाणाऱ्या या योजनेत १८ ते ७० या वयोगटातल्या किमान दहावी पास महिलांना विशेष प्रशिक्षण, आणि पहिल्या तीन वर्षांमध्ये छात्रवृत्ती दिली जाईल.
या योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात दोन लाख महिलांची भरती करण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.