डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ जाहीर

सर्व स्वरुपातलं सार्वत्रिक दारिद्र्य नाहीसं करण्याचं शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा मानस राज्य सरकारनं जाहीर केला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून आता दरमहा एक हजार ऐवजी दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल. दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ सरकारनं जाहीर केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 34 हजार 400 घरं बांधली जाणार आहे. बारी समाजाच्या विकासासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना निर्णय सरकारनं या अर्थसंकल्पात जाहीर केला. 

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातल्या सर्व कुटुंबांना सरकारनं लागू केली आहे. या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब दीड लाखांवरुन ५ लाख रुपये केली आहे. तसंच एक हजार 900 रुग्णालयांमधून एक हजार 356 प्रकारचे उपचार याअंतर्गत दिले जातील.