डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष २०२५ अखेरपर्यंत ४० हजार इमारतींवर सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट

जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष २०२५ अखेरपर्यंत शासकीय आणि निवासी अशा सुमारे ४० हजार इमारतींवर सौर ऊर्जेचे अनेक प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. यामुळे डिसेंबर २०२५ पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरिक्त २७० मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होणार आहे.

 

या माध्यमातून २० हजार घरगुती आणि किमान २२ हजार ४९४ शासकीय इमारतींचा यात समावेश होणार आहे. जम्मू आणि काश्मीर ऊर्जा विकास संस्था प्राथमिक स्तरावर याची अंमलबजावणी करणार आहे. या धर्तीवर वर्ष २०३० अखेरपर्यंत ५०० मेगावॅट तर वर्ष २०४७ अखेरपर्यंत १५०० मेगावॅट सौर ऊर्जेच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे.