२५ लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेअंतर्गत चेहरेपट्टी प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला असून यात सातत्यानं वाढ होत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा आज सिंह यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ९० वर्षांहून अधिक वय असलेल्या ३० हजारहून जास्त ज्येष्ठ नागरिकांना या तंत्रज्ञानाचा लाभ होत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्त देशभरातील दोन हजार जिल्हे, उपविभाग, शहरांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. नोव्हेंबर २०१४ पासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिम सुरू केली आहे.
Site Admin | November 5, 2025 8:29 PM | Dr. Jitendra Singh
डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात