डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नवनिर्वाचित संभासदांचा शपथविधी आजही सुरू

 

१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी सुरू आहेत. काँग्रेस खासदार गोवाल पाडवी, श्यामकुमार बर्वे, बळवंत वानखेडे, भाजपाचे खासदार अनुप धोत्रे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांनी आज शपथ घेतली.

 

काँग्रेस खासदार शोभा बच्छाव, भाजपा खासदार स्मिता वाघ यांनी मराठीतून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्लीशमधून शपथ घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, काल २६६ खासदारांनी शपथ घेतली होती. आज दुसऱ्या दिवशी उर्वरित खासदार शपथ घेत आहेत.