डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ॲक्सिओम फोर मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल

ॲक्सिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायू दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 1984 मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते; त्यांच्यानंतर 41 वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळात पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय अंतराळवीर होण्याचा बहुमानही शुभांशू शुक्ला यांना मिळाला आहे.

 

या ऐतिहासिक मोहिमेत भारताबरोबरच अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर 14 दिवस अंतराळ स्थानकात राहून गुरुत्वाकर्षण, किरणोत्सार, अवकाशातील बीजरोपण या संदर्भातील विविध प्रयोग करणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या डॉकिंग केल्याबद्दल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी शुभांशू शुक्ला आणि अॅनक्सिओम-फोर मिशनमधील अन्य अंतराळवीरांचं अभिनंदन केलं आहे. अॅतक्सिओम-4 मोहीमेच्या रूपानं अंतराळ क्षेत्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून या क्षेत्रातील भारताच्या क्षमतेचं दर्शन अवघ्या जगाला पुन्हा एकदा झालं आहे, असं डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा