हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथल्या संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळ्याचं पहिचं अश्व रिंगण काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर पार पडलं. १२ अश्वांच्या माध्यमातून पार पडलेल्या रिंगण सोहळ्याला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. आज ही पालखी औंढा नागनाथ मार्गे रवाना होणार आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांमध्ये अंध वारकऱ्यांची दिंडी लक्ष वेधून घेत आहे. वाशीम जिल्ह्यातून निघालेली ही दिंडी सध्या परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे. या वारीत पाच महिलांसह एकूण पंधरा वारकरी आहेत.