डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बकरी ईदचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा

बकरी ईदचा सण काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं नमाज पठणासह इतर कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं तीन ठिकाणी केलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यात काल म्हैस तसंच बकरीवर्गीय सुमारे शंभर जनावरांची कुर्बानी देण्यात आल्याचं, महापालिकेकडून जारी पत्रकात म्हटलं आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बकरी ईद पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. लातूर शहरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं. त्यानंतर जगभरात शांततेसाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.

जालना शहरासह जिल्ह्यात बकरी ईद पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरातल्या कदीम ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांनी सामुहिक नमाज अदा करून विशेष प्रार्थना केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.