परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची आज सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत नवी दिल्लीत होणार बैठक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री राजपुत्र फैसल बिन फरहान अल सौद यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून मैत्रीपूर्ण आर्थिक तसंच सामाजिक सांस्कृतिक संबंध आहेत. भारत हा सौदी अरेबियाचा दुसऱ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे तर सौदी भारताचा चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे. दर वर्षी होणारी हज यात्रा हादेखील दोन्ही देशांमधला महत्त्वाचा दुवा असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.