मकरसंक्रांतीचं पर्व देशभरात उत्साहाने सुरु झालं. आज संक्रांतीचा आदला दिवस. देशाच्या विविध भागात विविध नावांनी हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो. पंजाब, हरयाणा आणि उत्तर भारतात लोहडी, ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमधे माघ बिहू, महाराष्ट्र आणि तेलंगणात भोगी म्हणून साजरा केला जातो. गुजरातमधे उत्तरायणानिमित्त आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं. अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट, धोरडो, शिवराजपूर समुद्रकिनारा आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी अशा विविध ठिकाणी एकाच वेळी हा महोत्सव होत आहे. सावधानता आणि जिगिषा अशी यंदाची संकल्पना असून ४७ देशांमधून मिळून १४३ पतंगबाज या महोत्सवासाठी आले आहेत.
महाराष्ट्रातही संक्रांतीनिमित्त खरेदीचा उत्साह दिसत आहे. तीळ गूळ हलव्याचे दागिने, तसंच विविध आकारांचे रंगीबेरंगी पतंग अशा वस्तूंनी बाजार फुलले आहेत.
Site Admin | January 13, 2025 1:40 PM | भोगी | माघ बिहू | लोहडी
देशभरात लोहडी, भोगी, माघ बिहू इत्यादी सुगीच्या सणांचा उत्साह
