डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 18, 2024 3:19 PM | Vijay Wadettiwar

printer

विशाळगडावरी घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं – विजय वडेट्टीवार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान समाजकंटकांनी घातलेला हैदोस निंदनीय असून जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडलं. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं, तसंच नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात चौकशीच्या मागणीचं पत्र सरकारला दिलं आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.