डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 12, 2024 2:20 PM | Defense Minister

printer

युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवचिक संरक्षण धोरण महत्वाचं असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

सुरक्षा व्यवस्थेला उद्भवणारा धोका आणि युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवचिक संरक्षण धोरण महत्वाचं असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं दिल्ली संरक्षण संवादात बोलत होते. लवचिक संरक्षण धोरण ही केवळ धोरणात्मक निवड नाही तर आत्यंतिक गरज आहे, असंही ते म्हणाले. भविष्यातल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे धोरण लवचिकता, नाविन्य यावर आधारित असणं गरजेचं आहे, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं.