डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

निलंबनाचा फेरविचार करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपसभापतींना पत्राद्वारे विनंती

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागितली आहे.आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्राद्वारे केली आहे.

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी दिलगिरीची भूमिका घेतली आहे, पक्षप्रमुखांनीही माफी मागितली आहे, त्यामुळे त्यांच्या निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती आमदार अनिल परब यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना केली आहे. तसेच यावर निर्णय येईपर्यंत जमिनीवर बसून कामकाज ऐकू, अशी भूमिकाही त्यांनी घेतली.