डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशातल्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी दोषींना शिक्षा होईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातल्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सरकार गंभीर असून दोषींना शिक्षा होईल अशी ग्वाही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत दिली. यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली जात असल्याचं ते म्हणाले. दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. नीट परीक्षेसंदर्भात देशभरातून संशयितांना ताब्यात घेतलं असून, ही प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यसाठी पावलं उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा धोक्याच्या प्रसंगांचा सामना करण्यासाठी सरकारने यापुर्वीच एक भक्कम कायदा आणला असल्याची माहितीही त्यांनी दिली.