प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे, देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली असून, मेक इन इंडिया उपक्रमामुळं देशात उत्पादन वाढलं आहे, असं प्रतिपादन रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही.सोमन्ना यांनी काल चेन्नईतील पेरांबूर इथं इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात केलं. आयसीएफ दरवर्षी 50 वंदे भारत गाड्यांचे उत्पादन करेल. गेल्या वर्षी या कारखान्यात 3700 डबे तयार करण्यात आले होते आणि यावर्षी 4200 डबे तयार करण्याचं उद्दिष्ट आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | June 27, 2025 11:15 AM | Modi | PM Narendra Modi
प्रधानमंत्र्यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनामुळे देशातलं उत्पादन वाढलं आहे-राज्यमंत्री व्ही.सोमन्ना
