डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचं योगदान महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं प्रतिपादन

आदिवासी समुदायाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज देशभरात जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी काल देशवासीयांना संदेश दिला. देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचे योगदान महत्वाचे असून सध्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.