डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाची राज्यघटना प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे.  

तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर दिलं. भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखीच मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच राजकीय वारसा नसलेल्या व्यक्तीला राजकारणात येण्याची आणि इतक्या मोठ्या पदावर पोहचण्याची संधी मिळाली, असंही ते म्हणाले. काँग्रेस हा संविधानाचा सर्वात मोठा शत्रू असून त्यांची मानसिकता एससी, एसटी आणि ओबीसींना विरोध करण्याची आहे, अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली. 

प्रधानमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच, विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. विरोधकांकडे प्रश्नांची उत्तरं ऐकण्याचं धाडस नसल्यानं त्यांनी सभात्याग करत सभागृहाचा अपमान केल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.