डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 22, 2024 9:47 AM | CM Eknath SAhinde

printer

सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न – जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद-२०२४ या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातली ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले. आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज् आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये