जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निःपक्ष आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठीची वचनबद्धता भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निवेदनात दिली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत भारताने सामायिक समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करण्यावरही भर दिला. निर्यातीमधलं अवलंबित्व कमी करणं, पुरवठा साखळीतली लवचिकता वाढवणं या बाबी आवश्यक असल्याचंही भारताने या बैठकीत अधोरेखित केलं. व्यापार प्रवाह वाढवण्यासाठी समावेशक धोरण अवलंबणं महत्त्वाचं असल्याचंही भारताने स्पष्ट केलं आहे.
Site Admin | September 7, 2025 3:24 PM | ministry
बहुपक्षीय जागतिक व्यापारपद्धतीप्रति भारत वचनबद्ध असल्याचं केंद्र सरकारचं प्रतिपादन
