अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काल रात्री आपली उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केली. यासाठी आवश्यक असणारे अर्ज त्यांनी काल जमा केले. प्रत्येक मत मिळवण्यासाठी आपण कष्ट करू, असं सांगून निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे व्यक्त केला.

 

विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांच्या नावाची शिफारस केली होती. माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनीही नुकताच कमला हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा दिला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.