संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.23 जुलै रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.या अधिवेशानाचं कामकाज 12 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे.