रुपयाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मूल्य वाढवण्याचं खूप मोठं ध्येय देशासमोर असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. ते काल मुंबईत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भारतीय रुपया आणि डॉलरमध्ये होणाऱ्या व्यापाराला सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. यामुळे परकीय चलन आणि सरकारी रोख्यांच्या क्षेत्रात किरकोळ गुंतवणूकदारांनाही गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळेल, असं मल्होत्रा यावेळी म्हणाले.