डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ढाका येथे संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले बंगबंधू स्मारक संग्रहालय

बांग्लादेशमध्ये, राजधानी ढाका इथं बंगबंधू स्मारक संग्रहालय काल रात्री संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले. धनमोंडी हे संग्रहालय बांग्लादेशचे संस्थापक राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान शेख हसीनाचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचे वैयक्तिक निवासस्थान होते. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी रात्री 9 वाजता त्यांच्या पक्षाच्या बंदी घातलेल्या विद्यार्थी संघटनेला दुरस्थ माध्यमातून भाषण देण्याचं नियोजन होतं. याला विरोध दर्शवत कट्टरपंथीयांनी हा हल्ला केला. असा प्राथमिक अंदाज काही माध्यमांवरील बातम्यांमध्ये वर्तवण्यात आला आहे.